मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दाणादाण उडवून दिली असून
अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. कर्नाटक बॉर्डरजवळ
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
असलेल्या लातूर आणि नांदेड जिल्ह्यांनाही या पावसाचा मोठा फटका
बसला असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.
त्यामध्ये, लातूरमधील अनेक घरांचे व शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील नद्यांना पूरही आल्याचं पाहायला मिळालं.
मात्र, कर्नाटक पाटबंधाकेर विभागाची चूक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना
भोवल्याचं आता समोर आलं आहे. पावसाचा मोठा फटका येथील
शेतकऱ्यांना बसला असून प्रार्थमिक अंदाजानुसार साडेपाच हजार
हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. बाधित क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता असून
औराद शहाजानी, जळकोट, औसा भागातील बळीराजाचं मोठ नुकसान झालं आहे.
मांजरा नदी लातूर जिल्ह्यात 145 किलोमीटर चा प्रवास करते.
जिल्ह्यात रेणा, तेरणा यांसारख्या नद्या मांजरा नदीला येऊन मिळतात.
औराद शहाजानीच्या बाजूला तेरणा नदी मांजरला मिळते, संगम जिथे होतो
तिथे मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होत असते.
मात्र, यावर्षी त्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मांजरा आणि तेरणाचा
संगम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमारेषेवर होत असतो.
त्या पार्श्वभूमीवर मांजरा नदीवर कर्नाटकात कोगळी येथे बॅरेजेस बांधण्यात
आले आहेत, कर्नाटक पाटबंधारे विभागाकडून कर्नाटकात पूर परिस्थिती
निर्माण होऊ नये म्हणून बॅरेजचे दोनच दरवाजे उघडण्यात आले.
याचा थेट परिणाम मांजरा नदीच्या बॅक वॉटरच्या रूपाने झाला.
त्यामुळे, औराद शहाजानी शिवारातील हजारो हेक्टर शेतजमीन
पाण्याखाली गेली. कर्नाटक पाटबंधारे विभागाने केलेल्या या चुकीमुळे
मोठा फटका शेतातील मूग उडीद सोयाबीन यांसारख्या पिकांना बसला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/rss-representative-in-every-assembly-planning-meeting-of-bjp/