डेंग्यूचे 1013 रुग्ण, चिकनगुनियाचे 164 रुग्ण
लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ
मुंबईत पावसाळा सुरु झाला की, साथीचे आजार डोकं वर काढतात.
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
ऑगस्टमध्ये मुंबईत साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यीच
माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ऑगस्टच्या तुलनेत
जून आणि जुलैमध्ये पाऊस जोरदार होता. तरी साथीच्या आजारांमध्ये
वाढ झाली नव्हती. मात्र, ऑगस्टमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया
रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. चिकनगुनियाचे 164 रुग्ण आढळले आहेत.
स्वाईन फ्लू व कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. राज्यात
ऑगस्टपर्यंत डेंग्यूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता.
मुंबईप्रमाणे राज्यातही चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
मुंबईमध्ये जून व जुलैमध्ये आवाक्यात असलेल्या चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये
ऑगस्टमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये चिकनगुनियाचे 164
रुग्ण सापडले असून, राज्यामध्ये 1123 इतके रुग्ण सापडले आहेत.
मुंबईत हिवतापाचे 1171 रुग्ण, डेंग्यूचे 1013 रुग्ण, लेप्टोचे 272 रुग्ण, कावीळ 169
आणि स्वाईन फ्लूचे 170 रुग्ण सापडले आहेत. जुलैमध्ये स्वाईन फ्लूने अचानक
डोके वर काढले. जुलैमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी
साचण्याच्या घटना वाढल्या. परिणामी साचलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास
करावा लागला. त्यामुळे त्या काळात लेप्टोचे रुग्णांमध्ये वाढ झाली. त्यामुळे हिवताप,
डेंग्यूपाठोपाठ स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. मात्र ऑगस्टमध्ये अधूनमधून
होत असलेला पाऊस व वाढते ऊन यामुळे हिवताप, डेंग्यूच्या रुग्णांबरोबरच
चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/suspected-cookie-atirekyakaduna-drone-bombcha-vapor-in-manipur/