छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर
उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. यानंतर शिवप्रेमींमध्ये
संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांनीही याबद्दल आक्रमक
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
पावित्रा घेतला आहे. आता याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत
यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. “सिंधुदुर्गातील राजकोट
किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला नाही
तुम्ही तोडलात”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी
एक धक्कादायक वक्तव्य केले. “तुम्हीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
तोडलात. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही”,
असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. “ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी
विश्वनाथांनी मराठा साम्राज्य लयास नेलं आणि सर्वात आधी पुण्याच्या
शनिवार वाड्यावर ब्रिटीशांचा यूनियन जॅक फडकवला त्या पेशव्याचे उत्तराधिकारी
देवेंद्र फडणवीस आहेत. त्याशिवाय त्यांनी अशी भाषा केली नसती. देवेंद्र फडणवीस
कोणता इतिहास सांगत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी
आम्ही लढत आहोत आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय.
आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देण्यास विरोध करताय.
मालवणमध्ये महाराजांचा पुतळा तोडला हे तुमचं पाप आहे. तुम्हीच तोडलात.
तुटला नाही तोडलात”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.