महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईओडब्ल्यूने दिलेल्या क्लीन चिटला
Related News
अकोट तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
विरोध करण्यात आला आहे. यामुळे अजित पवारांच्या चिंतेत
वाढ झाली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना
क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र याला विरोध करत चार नवीन
याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत.
सहकार क्षेत्रातील सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध
याचिका सादर करण्यात आली आहे. अजित पवारांविरोधातील खटला
बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं विशेष न्यायालयात
क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यात अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा
पवारांसह बँकेच्या 80 संचालकांना क्लीन चिट देण्यात आली होती.
त्यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यावर आक्षेप नोंदवला. तसेच याला
विरोध करणाऱ्या चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल
करण्यात आल्या. या याचिकांवर येत्या 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sankalp-environment-friendly-ganeshotsavcha/