गणेश मूर्ती साकारण्यात विद्यार्थी तल्लीन
डॉ सुगत वाघमारे यांच्यातर्फे कार्यशाळेचे आयोजन
डॉ. सुगत वाघमारे यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण व संवर्धन
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
कामात सक्रिय असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी आगामीग
णेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार केल्या.
या कार्यक्रमात तब्बल 567 विद्यार्थी सहभागी झाले होते.
मुर्तीजापुर येथील राधा मंगलम येथे आज हा बाल महोत्सव रंगला.
या कार्यशाळेचे आयोजन प्रसिद्ध उद्योजक, तीक्ष्णगत मल्टीपर्पज
सोसायटीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ सुगत वाघमारे यांनी केले होते.
विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी आज
पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत 567 विद्यार्थ्यांनी बाप्पांच्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती साकारल्या.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यशाळेला सुरुवात
करण्यात आली. प्रख्यात पर्यावरण प्रेमी शरद कोकाटे या कार्यशाळेला
प्रशिक्षक म्हणून लाभले होते. गणेश मूर्ती निर्मितीला लागणारे
संपूर्ण साहित्य आयोजक डॉ. सुगत वाघमारे त्यांच्यातर्फे निशुल्क देण्यात आले होते.
ज्यांच्या हातात दिवसभर मोबाईल असतो आज त्यांच्या हातात
गणरायाची मूर्ती होती. विद्यार्थी श्री गणेशाची मूर्ती साकारण्यात
तल्लीन झाले होते. मोबाईल व टीव्हीच्या बाहेरही मुले रमतात याचा
पालकांना व उपस्थितांना प्रत्यय आला. लहानांपासून मोठ्यापर्यंत
सर्वांनी कार्यशाळेचा आनंद घेतला. शरद कोकाटे, एडवोकेट संजय सेंगर,
दिनेश पारेख, प्रतिमा मानधने, कल्पना राव उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी संत गाडगेबाबा सेवा समिती ने परिश्रम घेतले
तर आभार जया भारती यांनी मानले.
Read also: https://ajinkyabharat.com/rss-big-meeting-320-officials-present/