मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात लष्कराचा ट्रक
खोल दरीत पडला. यामध्ये लष्कराचे ३ जवान शहीद झाले असून ४ जण
Related News
ठाणे-कल्याणमध्ये घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी;
बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची पाकिस्तानातून सुरक्षित वापसी
कान्समध्ये उर्फी जावेदचा डेब्यू उधळला;
शोपियांमध्ये ‘ऑपरेशन केलर’ दरम्यान मोठी कारवाई;
“अकोल्याच्या पातुर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे…
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करावं की विकावं
अकोल्यातील पाच मोठ्या सराफा दुकांनांवर आयकर विभागाची धाड,
शहीद मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी परदेश यात्रा रद्द;
“सीजेआय पदाची शपथ घेण्याआधी आईचं आशीर्वाद घेतलं”
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
जखमी झाले आहेत. हवालदार नखत सिंग, नाईक मुकेश कुमार आणि
ग्रेनेडियर आशिष अशी मृत जवानांची नावे आहेत. अरुणाचल प्रदेशातील
अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील लिमेकिंगपासून १५ किमी अंतरावर बोरारुपकजवळ
हा अपघात झाला. हा अपघात जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 145 किलोमीटर
अंतरावर झाला. या प्रकरणाबाबत इटानगर पोलिसांनी सांगितले की,
अपघातात तिन्ही जवानांचा जागीच मृत्यू झाला. चार जखमींना रुग्णालयात
दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या ईस्टर्न कमांडनेही जवानांच्या मृत्यूबद्दल
शोक व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना लेफ्टनंट जनरल
आर. सी. तिवारी म्हणाले, अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना शूर हवालदार
नखत सिंग, एनके मुकेश कुमार आणि जीडीआर आशिष यांच्या दुःखद निधनाबद्दल
मी मनापासून शोक व्यक्त करतो. भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबियांच्या
पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bsp-president-mayawatis-unanimous-decision/