महाराजांचा पुतळा कोसळल्याने वैभव नाईक यांनी फोडलं बांधकाम विभागाचे कार्यालय

मालवण

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा

कोसळल्यानं उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक चांगलेच

आक्रमक झाले आहे. मालवण येथील सार्वजनिक बांधकाम

Related News

विभागाच्या कार्यालयाची आमदार वैभव नाईक यांनी तोडफोड केली आहे.

पुतळ्याची देखभाल व निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक

बांधकाम विभागाकडे होती. त्यामुळे या विभागाचे कार्यालय फोडण्यात आले आहे.

स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी देखील यावर

प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘मालवण येथील राजकोट

किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची

अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने

अत्यंत घाईगडबडीत सरकारने पुतळा उभारला व उद्घाटन केले.

त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे छत्रपती संभाजीराजे व शिवभक्तांनी

कळवले होते. आजच्या घटनेने असंख्य शिवभक्तांच्या भावना दुखावल्या

गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे कार्य उत्तुंग आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेता येत नसतील तर किमान त्या

विचारांना ठेच लागेल असे कृत्य करू नका’ असे म्हणाले.

Read also:  https://ajinkyabharat.com/we-have-no-connection-with-kanganas-statement-bjp-issues-letter/

Related News