भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत पुणे आणि सातारा
येथील घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मान्सूनच्या हालचालींमध्ये घोणाऱ्या लक्षणीय बदलानंतर हा इशारा
Related News
फक्त कपड्यांपुरतेच नाही! अॅक्सेसरीजमधूनही करा कलर ब्लॉकिंगचा स्टायलिश प्रयोग
कलर ब्लॉकिंगचा नवा ट्रेंड : फॅशनमध्ये रंगांचा खेळ नेह...
Continue reading
मानसशास्त्र सांगते: संभाषणातील ही एक सवय नकळत लोकांना तुमच्यापासून दूर करते
मानसशास्त्र सांगते : काही सवयी अशा असतात ज्या नातेसंबंधांमध्ये ...
Continue reading
'Hai Jawani Toh Ishq Hona Hai'ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी; दोन दिवसांत केवळ 23 कोटींची कमाई
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा बहुचर्चित रोमँटिक-कॉमेडी चित्रपट '
Continue reading
"महिला भूक भागवण्यासाठी नव्हे, तर भावनिक आधारासाठी खातात"; Shefali Shah यांचे भावनिक खाण्यावर भाष्य
बॉलिवूड अभिनेत्री Shefali Shah यांनी नुकतेच म...
Continue reading
'Peddi'चा बॉक्स ऑफिसवर धडाका कायम! तिसऱ्या दिवशीही कोट्यवधींची कमाई; 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेशाची तयारी
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतीक्षित चित्रपट '
Continue reading
World Food Safety Day 2026 : अन्नसुरक्षेबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज; जाणून घ्या महत्त्वाच्या समजुती आणि सत्य
अन्न हे मानवी जीवनाचे मूलभूत गरजांपैकी एक असले तरी त्याची सुरक्षित...
Continue reading
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत : उन्हाळ्यातील ताजेतवाने फुलांचे ६ नैसर्गिक पेय
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची...
Continue reading
सहारा वाळवंटात मृत्यूचा सापळा; ट्रक बंद पडल्याने 50 भाविकांचा करुण अंत, दोन जणांचा चमत्कारिक बचावआफ्रिका खंडातील सहारा वाळवंटातून एक अत्यंत हृदयद्राव...
Continue reading
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
झटपट आणि चविष्ट कम्फर्ट मील: Burnt Garlic Noodles ची वाढती लोकप्रियता
घरच्या घरी काही मिनिटांत तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ; प्रत्येक नूडल्स प्रेमीसाठी खास पर्यायआजच्या धावपळी...
Continue reading
चहा जास्त कडक आणि कडू झाला? फेकू नका; या सोप्या उपायांनी चवदार बनवा
चहा हा भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळची सु...
Continue reading
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पाठिमागील दोन दिवसांपासून दमदार
पावसास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मुंबई शहर, उपनगर तसेच,
ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान, अनुस्कुरा घाटात शुक्रवारी रात्री उशिरा दरड कोसळली,
ज्यामुळे राजापूर-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
राज्यभरात सुरु असलेल्या असलेल्या मुसळधार पावसामुळे येत्या
काही दिवसांत आणखी भूस्खलन होण्याची शक्यता आहे, असा इशारा
आयएमडीने दिला आहे. “मान्सून राज्याभर सक्रिय आहे, आणि दक्षिण
गुजरातपासून दक्षिण केरळच्या किनारपट्टीपर्यंतचा समुद्रकिनारा
मान्सूनसाठी अनुकुल आहे,” असे IMD पुणे येथील शास्त्रज्ञ एस.डी. सानप
यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की अरबी समुद्रातून कमी दाबाचा
पश्चिम प्रवाह शुक्रवारपासून तीव्र झाला आहे आणि तो पुढील दोन ते तीन
दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी
दाबाच्या क्षेत्रामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे, जी पश्चिमेकडे
सरकत आहे आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मान्सूनच्या प्रवाहाला मजबुती देत आहे.
IMD ने रविवारी पुणे शहरासाठी धोक्याचा आणि सावधानतेचा
इशारा दिला आहे. ज्यामध्ये कमी झालेली दृश्यमानता, निसरडे रस्ते,
वाहतूक व्यत्यय आणि सखल भागात मध्यम पाणी साचणे यासारख्या
बाबी पाहायला मिळतील असे म्हटले आहे. डोंगराळ प्रदेशात झाडांच्या
फांद्या पडणे, किरकोळ भूस्खलन आणि चिखलही पाहायला मिळेल,
असेही या इशाऱ्यात म्हटले आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रवास करण्यापूर्वी
रहदारीची स्थिती तपासावी, सूचनांचे पालन करावे, पाणी साचलेले क्षेत्र
टाळावे आणि असुरक्षित ठिकाणांपासून स्वत:ला दूर ठेवावे, असे म्हटले आहे.
मुंबई शहर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उपनगरी मुंबई आणि
ठाणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये IMD ने पुढील 24 तासांसाठी
परीसरात पूरजन्य स्थिती उद्भवू शकते असे म्हटले आहे. त्यामुळे या
प्रदेशातील रहिवासी आणि प्रवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/amravati-nagpur-mahamargavar-shivshahi-bus-accident/