जालन्यातील औद्योगिक वसाहतीत स्टील कंपनीत स्फोट

जालन्यातून

जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. औद्योगिक वसाहतीत

एका स्टील कंपनीत मोठा स्फोट झाला. ज्यामुळे वितळवलेला धातू

आंगावर पडल्याने अनेक मजूर जखमी झाले आहेत. अंगावर वितळलेले

Related News

लोखंड पडल्याने 22 जण गंभीर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सर्व जखमींवर रुगणलयात उपचार सुरू आहेत. गजकेसरी स्टील कंपनीत

हा स्फोट घडला आहे. जखमींमध्ये काहीची प्रकृती अतिशय गंभीर आहे.

तीन ते चार मजूर या अपघातात गंभीर जखमी झाल्याची प्रथमदर्शनी कळाले आहे.

स्फोट दुपारच्या सुमारास झाल्याचे समजते. औद्योगिक वसाहतीत गजकेसरी

स्टील नावाची कंपनी आहेत. लोखंड वितळवण्याच्या भट्टीत काम सुरू

असताना हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण समोर आलेले नाही.

पातळ धातू आणि त्यावरून घन वस्तू पडल्यानं सर्व धातू बाहेर उडला गेला.

ज्यामुळे विस्फोट झाला. या भट्टीच्या आजूबाजूला अनेक मजूर काम करत होते.

ते सर्व भाजले गेले. जवळच्या रुग्णालयात त्या सर्वांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी त्याबाबतची माहिती दिली. दरम्यान ,

या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीत भितीचे वातावरण आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/helicopter-crashes-in-paud-area-of-u200bu200bpune/

Related News