निषेध आंदोलनात सुप्रिया सुळे यांची सरकारवर आगपाखड

'राज्यात

‘राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ, वर्दिचा धाक राहिला नाही’

बदलापुरात लहान शळकरी मुलींवर अत्याचार शाळेतच लैंगिक अत्याचार

झाल्याची घटना घडली आहे. त्यावर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.

Related News

नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या विरोधात

महाविकास आाघाडीकडून राज्यभरात निषेध आंदोलन सुरु आहे.

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ्याफित्या आणि मुखपट्टी लावून

निषेध आंदोलन केलं. यावेळी शरद पवार आणि कार्यकर्त्यांनी भरपावसात

आंदोलन केलं. अत्याचाराच्या विरोधात शरद पवारांनी कार्यकर्त्यांनी शपथ दिली.

महिला अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ घोषणा केली होती.

मात्र, हायकोर्टाने बंद बेकादेशीर ठरवला. त्यानंतर महाविकास आघाडीने निषेध

आंदोलन करण्याचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार, सुप्रिया सुळे

आणि कार्यकर्ते राज्यभ आंदोलन करत आहेत. पुण्यात पुणे स्टेशनजवळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शरद पवार गटाकडून मूक आंदोलन

करण्यात आलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला अत्याचारावरून सरकारवर टीका केली.

पुण्यातील निषेध आंदोलनात सुप्रिया सुळे म्हणाल्या,’आता वर्दीची भीतीच

राहिलेली नाही. बदलापूर सारख्या अनेक घटना महाराष्ट्रात होत आहेत.

सरकार अंसवेदनशील आहे. बदलापूर येथील आंदोलनकर्ते बाहेरचे होते,

असे म्हणतात. पण ते भारतीय होते. त्यांनी आंदोलन केले तर काय चुकले.

पुण्यात रक्ताचे नमुने बदलला जातात, ड्रग माफिया पळून जातो, कोयता गॅंग आहे.

पुण्यात अशी एकंदरित परीस्थिती आहे. माध्यमांनी सांगितले की, आंदोलक स्थानिकच होते.

म्हणजे सरकार या घटनेवर सरकार गलिच्छ राजकारण करत आहे.

सरकारचा आणि त्या कृतीचा जाहीर निषेध करते’.

Read also: https://ajinkyabharat.com/uddhav-thackerays-black-ribbon-bandhun-movement-in-rainy-season/

Related News