उद्धव ठाकरेंचे भर पावसात काळ्या फिती बांधून आंदोलन

बदलापूरमधील

बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना

समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मुंबईमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले.

Related News

विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी

(अजित पवार गट) यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.

आज महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे दादरमधील शिवेसनेच्या मुख्य कार्यालयाबाहेर

आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी

जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनात शिवसेना (ठाकरे गट)

पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,

आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित होते.

एकीकडे पाऊस चालू असताना हे आंदोलन करण्यात आले. भर पासवात

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत आंदोलनस्थळी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या.

Read also: https://ajinkyabharat.com/sharad-pawar-gatacha-mumbai-7-jaganwar-claim-for-legislative-assembly/

Related News