नंदुरबारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील
धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
आहे. या चेंगराचेंगरीत दोन महिला बेशुद्ध पडल्या असून त्यांना
उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ई केवायसीसाठी
बँकेत महिलांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेत
ई केवायसीसाठी आदिवासी महिलांनी आज सकाळपासून बँकांसमोर
तुफान गर्दी केली होती. भर पावसात बँकेसमोर एक ते दोन किलोमीटर पर्यंतच्या
रांगा लागल्या होत्या. यावेळी महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली.
यात गर्दीमध्ये दोन महिलांची प्रकृती खराब झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या.
त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तसेच बँकेत महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग नसल्याने अनेक महिलांसोबत
छेडखानी झाल्याचाही माहिती मिळत आहे. मात्र छेडखानीसंदर्भात
कोणत्याही महिलेने अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/movement-for-loan-waiver-of-farmers-comes-from-jaranganche/