मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे
पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सगेसोयरे आणि
कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं, पण ते पूर्ण न केल्यामुळे
आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे
यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे 29 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकांसंदर्भात
मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा करण्यात येणार होती, पण त्यांनी
आपला निर्णय पुढे ढककला आहे. त्यामुळे, आता शेतकऱ्यांच्या
न्याय व हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याची घोषणा करत,
मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार
असल्याचं म्हटलं आहे. आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी आंदोलन
करनार असून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात याच अनुषंगाने
बैठका घेणार असल्याचंही त्यानी जाहीर केलं आहे. मतदार संघानिहाय
बैठकांमध्ये मराठा आरक्षणासह शेतकरी आणि इतर सर्वच मुद्दे
घेण्यात येणार असल्याचं मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सांगितलं.
लवकरच शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार असून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती
झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी आणि
पीकविम्याचे पैसे राहिले आहेत, सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना फसवते,
आता सरकार कसे कर्जमाफी करत नाहीत हे पाहतो, असेही जरांगे यांनी म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/work-starts-and-stops-during-udya-maharashtra-bandh/