‘लखपती दीदीं’ना करणार प्रमाणपत्रांचे वाटप
केंद्राच्या ‘लखपती दीदी’ योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना
प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी आणि कार्यक्रमादरम्यान
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
महिला मेळाव्याला संबोधित करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी
25 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर येणार आहेत.
यावेळी काही लाभार्थींना शहराच्या सीमेवर असलेल्या जळगाव विमानतळाजवळील
कार्यक्रमाच्या मैदानावर आमंत्रित केले जाणार आहे.
या ठिकाणी त्यांना कार्यक्रमादरम्यान प्रमाणपत्रे दिली जातील,
तर इतरांना त्यांच्या गावात प्रमाणपत्रे दिली जातील. या कार्यक्रमाला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डीसीएम देवेंद्र फडणवीस व अजित पवार
हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम केंद्रीय ग्रामीण
विकास मंत्रालयाने आयोजित केला आहे.
यावेळी 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.
या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा एक फिरता निधी- कम्युनिटी
इन्व्हेस्टमेंट फंड जारी करतील, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या (SHGs) सुमारे
48 लाख सदस्यांना फायदा होईल. यावेळी पंतप्रधान 5000 कोटी रुपयांचे
बँक कर्ज देखील जारी करतील, ज्यामुळे 2,35,400 बचत गटांच्या (SHGs)
25.8 लाख सदस्यांना फायदा होईल.
लखपती दीदी या अशा महिला आहेत ज्या वार्षिक 1 लाख किंवा त्याहून अधिक कमावतात.
या लखपती दीदींनी केवळ आपल्या कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढले नाही,
तर त्या समाजातील इतरांसाठी आदर्श बनत आहेत.
ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दिदी तयार केल्या आहेत.
आता सरकारचे लक्ष्य पुढील 3 वर्षांत 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आहे.
दरम्यान, पीएम मोदींच्या या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री
गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन, या मार्गावरील वाहतूक वळविण्याचे
नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून 50 किलोमीटर क्षेत्र,
22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट नो ‘नो फ्लाईंग झोन’ असणार आहे.
यासह 24 ऑगस्ट रात्री 8 पासून 25 ऑगस्ट संध्याकाळी 6 पर्यंत
व्यावसायिक उड्डाणे राहणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarangenshi-discussion-with-prithviraj-chavan/