एमपीएससी आंदोलकांची पुणे पोलिसांकडून अखेर धरपकड
करण्यात आली आहे. पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससी
विद्यार्थ्यांचं विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु होतं. त्यांच्या या
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
आंदोलनात आमदार रोहित पवार हे देखील सहभागी झाले होते.
यानंतर सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
तरीदेखील आंदोलक आपल्या इतर मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम होते.
दुसरीकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मान्य केल्यानंतर पुणे पोलिसांनी
आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होत आंदोलकांची धरपकड केली.
यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या या कारवाईला विरोध केला.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी
आंदोलकांची भेट घेतली होती. सरकारने आंदोलकांची मागणी मान्य
केली नाही तर मी स्वत: या आंदोलनात सहभागी होणार,
असा इशारा माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी दिला होता.
पुणे पोलिसांनी कारवाईदरम्यान माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “त्यांची मागणी
शासनाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं.
उपोषण सोडल्यानंतर तिथे वारंवार मुलं बसत आहेत. तीन दिवसांपासून
वाहतूक बंद आहे. आम्ही त्यांना वारंवार विनंती केली आहे. आमच्याकडे
आता पर्याय नाही. आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना आम्ही आता
पोलीस ठाण्याला घेऊन जात आहोत”, अशी प्रतिक्रिया कारवाई करणाऱ्या
पोलीस अधिकाऱ्याने दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/you-can-watch-kalki-2898-ad-tonight-on-otv/