आसाममध्ये बदलापूरसारखा उद्रेक

अल्पवयीन

अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यामुळे नागरिक संतप्त 

बदलापूर येथे दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर मंगळवारी

(२० ऑगस्ट) बदलापूर येथे मोठे आंदोलन उभे राहिले.

Related News

काहीशी अशीच परिस्थिती आसाममधील शिवसागर शहरात पाहायला मिळाली.

याठिकाणी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यामुळे

मोठा संघर्ष निर्माण झाला. मुलीचा विनयभंग करणारा आरोपी हा

मारवाडी समाजातील असल्यामुळे शहरात बाहेरचे विरुद्ध आसामी असा

संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळाले. आसामच्या उल्फा या अतिरेकी संघटनेने

मारवाडी समाज बाहेरचा असल्याचे सांगून त्यांच्याविरोधात आंदोलन छेडले.

त्यानंतर मारवाडी समाजाने कॅबिनेट मंत्र्यासमोर गुडघे टेकून माफी मागितली.

सदर प्रकरण १३ ऑगस्ट रोजी घडले. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक

करून भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

दोन्ही आरोपी हे स्थानिक व्यापारी समुदायाचे असल्यामुळे या घटनेचे पडसाद

स्थानिक विरूद्ध बाहेरचे अशा स्वरुपात पाहायला मिळाले. शहरात बहुतेक दुकाने

ही मारवाडी समाजाची आहेत. त्याचाही राग यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

आसामी राष्ट्रवादी संघटनेच्या ३० कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केल्यामुळे

बिगर आसामी व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली. या आंदोलनानंतर राज्याचे

कॅबिनेट मंत्री आणि शिवसागर जिल्ह्याचे पालकमंत्री रनोज पेगू यांनी आसामी

राष्ट्रवादी संघटना आणि मारवाडी समूहाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत

मारवाडी समाजाचे पुरूष आणि महिलांनी संघटनेची यांची माफी मागितली. तसेच

माध्यमांसमोर जाहीर दिलगिरीहीव्यक्त केली. त्यानंतर आंदोलकांना पान खायला देऊन प्रकरण मिटवले.

Read also: https://ajinkyabharat.com/ujjwal-nikam-ladhanar-of-badlapur-atrocities-case/

Related News