विनेश फोगाट उतरणार राजकारणाच्या आखाड्यात

महिला

महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आता राजकारणात उतरण्याची

दाट शक्यता आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्राने दावा केला आहे की,

कुस्तीपटू विनेश फोगाट आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक

Related News

लढवणार आहे. याआधी विनेश फोगाटने सक्रिय राजकारणात

येण्यास नकार दिला होता, परंतु ताज्या मीडिया रिपोर्टनुसार,

काही राजकीय पक्ष तिला निवडणूक लढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

2024 च्या ऑलिम्पिकनंतर विनेशच्या भविष्यातील योजनांबद्दल

विचारले असता, फोगाट कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की,

कदाचीत आगामी हरियाणा निवडणूकीत विनेश फोगाट विरुद्ध

बबिता फोगाट या बहिणींमध्ये आणि बजरंग पुनिया विरुद्ध योगेश्वर दत्त

असे चित्र दिसू शकते. पण, जर विनेश राजकारणात प्रवेश करणार असेल,

तर कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read also: https://ajinkyabharat.com/bjps-uddhav-thackeray-the-people-who-are-trying-to-suppress-the-atrocities-in-badlapurcha-school/

Related News