पावसाळ्यात मधुमेहींनी काळजी घ्यावी

'नेमेचि

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ हे सृष्टीचे कौतुक असले, तरी पावसाळ्या बरोबरच

अनेक आजारही येत असतात किंवा आधीच आजारी असलेल्या लोकांना

अधिक काळजी घ्यावी लागत असते. पावसाळ्यात विशेषतः मधुमेहग्रस्तांना

Related News

आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील अति दमटपणामुळे

अनेकदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे कठीण जाते.

उष्णता आणि हवेतील ओलावा यांमुळे जी आर्द्रता निर्माण होते, त्याचा थेट परिणाम

आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. अति दमटपणामुळे तणाव वाढतो

आणि त्यामुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. कॉर्टिसोल हा ‘स्ट्रेस हार्मोन’ आहे;

ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. कॉर्टिसोल हार्मोनमुळे

मधुमेही रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते; ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात.

अति दमटपणामुळे शारीरिक थकवा जाणवतो आणि त्यामुळे तुम्हाला शरीराची

हालचाल करण्याची इच्छा होत नाही आणि एका जागी बसून राहावेसे वाटते.

कमी शारीरिक हालचालींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

हे अजूनही सिद्ध झालेले नाही; पण काही पुरावे सांगतात की, दमट वातावरणामुळे

शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे डिहायड्रेनशची समस्या निर्माण होते.

जेव्हा शरीरातील पेशींना रक्तातील ग्लुकोज शोषून घेण्यास अडचण जाणवते

तेव्हा शरीराला आणखी इन्सुलिनची आवश्यकता भासते. दमटपणामुळे जेव्हा तुम्ही

औषधी घेत नाही तेव्हा त्याचा थेट परिणाम रक्तातील साखर नियंत्रणेवर होतो आणि

रक्तातील साखर अचानक वाढते. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी याबाबत

तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती. दमटपणामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे

खूप कठीण जाते. पण, रक्तातील साखरेच्या पातळीविषयी आपल्या आरोग्यतज्ज्ञाला

नियमित माहिती देणे आणि त्याविषयी आवश्यक सल्ला घेणे गरजेचे आहे.

चांगला संतुलित आहार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modi-visits-poland-and-ukraine/

Related News