रश्मिका मंदाना चमकणार छावा चित्रपटात; अंगावर शहारे आणणारा टीजर रिलीज

बॉलीवूड

बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलचा आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट

छावाचा टीजर जारी करण्यात आला आहे. टीजरमध्ये हजारों सैनिक

लढताना दिसत आहेत. विक्की कौशलचा जबरदस्त लूक समोर आला आहे.

Related News

हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसेल.

त्याचा पहिला लूक सोशल मीडियावर पाहायला मिळाला आहे.

आता चित्रपटाचे टीजर रिलीज करण्यात आले आहे. हा टीजर अंगावर शहारे आणणारा आहे.

तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे.

छावाच्या टीजरची सुरुवात तलवारांच्या आवाजाने आणि घोड्यांच्या टापाने होते.

ज्यामध्ये हजारों सैनिकांची तुकडी रक्ताने माखलेले दिसत आहेत.

बॅकग्राऊंडमध्ये एक आवाज ऐकू येतो, छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते हैं,

और शेर के बच्चे को छावा… त्यानंतर विक्की कौशल हजारों सैनिकांच्या तुकडीसोबत

लढताना दिसतात. त्यानंतर अक्षय खन्नाचा जबरदस्त लूक समोर येतो.

मॅडॉक फिल्म्स आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरने छावाच्या टीजरने सर्वांना आश्चर्यात टाकले आहे.

या टीजरमध्ये विक्की महान मराठा योद्धा संभाजी महाराजांच्या भूमिकेत शक्तिशाली

रूपात दिसत आहे. छावा ६ डिसेंबर, २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

Read also: https://ajinkyabharat.com/manyachiwadi-first-solar-village-in-the-state/

Related News