‘लाडकी बहीण नको, बहिणींना सुरक्षा द्या’ बदलापूरात आंदोलक आक्रमक!

बदलापूरमधील

 बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर

लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणातील एका पीडित मुलीचे वय

तीन वर्षे 8 महिने आहे. तर दुसरी पीडित मुलगी अवघ्या सहा वर्षांची आहे.

Related News

या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे.

बदलपुरात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

या प्रकरणातील गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी

आंदोलकांकडून केली जात आहे.  दरम्यान, लैंगिक अत्याचाराचे हे प्रकरण

समोर आल्यानंतर आंदोलकांनी संबंधित शाळेची तोडफोड केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल.

हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची चौकशी केली जाईल,

असे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-midnight-delhi/

Related News