देवेंद्र फडणवीस मध्यरात्री दिल्लीत!

अमित

अमित शाहांसोबत दीड तास चर्चा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते.

मध्यरात्री दिल्लीला जात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे वरिष्ठ नेते

Related News

आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दीड तास

फडणवीस आणि अमित शाह यांची भेट झाली. यावेळी आगामी निवडणूक

आणि राज्यातील सद्यस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाली.

मागच्या काही दिवसांपासून महायुतीत धुसफूस सुरु आहे.

तीनही पक्षांमध्ये काही मुद्द्यांवरून वाद असल्याची माहिती आहे

आणि याच मुद्द्यावर फडणवीस आणि अमित शाह यांच्यात

चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात विधानसभा

निवडणूक होणार आहे. मात्र तत्पूर्वी महायुतीत समन्वय नसल्याच्या

बातम्या येत आहेत. फाईल्स अडवणुकीचं राजकारण सुरु आहे.

या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतली तसंच

त्यांच्यासोबत या मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर

भाजपने मोठी जबाबदारी दिल्याची माहिती आहे. क्लस्टर चेह-यांचा फार्म्युला

भाजप या निवडणुकीत वापरणार आहे. मराठा, ओबीसी आणि आदिवासी

नेत्यांवर निवडणुकीत महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे, नारायण राणे, आशिष शेलार

यांच्यावर मुख्य जबाबदारी दिली जाणार असल्याचं कळतं आहे. त्यामुळे

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच भाजप ही निवडणूक लढणार असल्याचं दिसत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-marathwada-for-next-five-days/

Related News