‘विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस’, IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी

भारतीय

भारतीय हवामान विभाग ने देशभरातील विविध राज्यांसाठी

ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये 20 ऑगस्ट 2024 रोजी

अचानक मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Related News

हवामान अंदाज वर्तवताना आयएमडीने म्हटले आहे की,

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तराखंड, लक्षद्वीप, पुडुचेरी आणि केरळ

या राज्यांमध्ये पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो.

याशिवाय आजचे आणि उद्याचे हवामान सर्वसाधारण सारखेच राहण्याची

शक्यताही व्यक्त करण्या आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर

दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण बांगलादेशात सागरी भागात कमी दाबाचे क्षेत्र

तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवसांत पूर्व आणि

पूर्व-मध्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील प्रादेशिक हवामान केंद्राने हलका पाऊस आणि सामान्यतः

ढगाळ आकाशासह कमाल तापमान 36°C आणि किमान 27°C राहण्याचा

अंदाज वर्तवला आहे. राष्ट्रीय राजधानीत पुढील पाच दिवस आकाश ढगाळ

आणि वातावरणात गारवा राहील, असा हवामान अंदाज आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-ordered-to-appear-in-pune-session-court/

Related News