लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढून टाका, माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

सध्या

 सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांच्या खात्यात महिना

1500 रुपयांच्या मदत देणार आहे. अनेक महिलांच्या खात्यात

Related News

पैसे देखील जमा झाले आहेत. मात्र, अनेक महिलांना या योजनेसाठी

अर्ज करताना अडचणी येत आहेत.

शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सर्व्हर वारंवार बंद असल्याने

योजनेमध्ये नोंदणीला विलंब होत आहे. काही ठिकाणी नोंदणीच होत नसल्याचे

प्रकार निदर्शनास येत आहेत. सहा-सहा तास ओटीपी येत नाही.

त्यामुळे लाभार्थींना दिवस-दिवसभर आधार केंद्रात ताटकळत बसावे लागत आहे.

त्यामुळे अंतिम तारखेपर्यंत नाव नोंदणी होऊ शकणार नाही ही चिंता निर्माण झाली आहे.

त्यामुळे  या योजनेच्या मुदतीची अट काढून टाकावी जेणेकरुन राज्यातील

सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ घेता येईल अशी मागणी माजी मुख्यमंत्री

पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

तसेच याबाबतचे ट्विट सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/on-what-basis-will-mahavikas-aghadit-be-held/

Related News