तीन आमदारांसह चंपई सोरेन दिल्लीत दाखल

झारखंडमध्ये काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका होणार असून,

त्याआधी तेथे राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री

चंपई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. चंपई सोरेन

Related News

तीन आमदारांसह दिल्लीत पोहोचले आहेत. एअर इंडियाच्या विमानाने

ते कोलकातामार्गे दिल्लीला आले आहेत. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी सांगितले की,

मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आलो आहे.

मी कोलकात्यात कोणाला भेटलो नाही, असेही ते म्हणाले.

चंपाई सोरेन आधीच भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असून ते कधीही

भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे बोलले जात आहे. मात्र, चंपई सोरेन यांनी

आपण भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितलेही नाही किंवा त्यांनी ते स्पष्टपणे

नाकारलेही नाही. हा प्रश्न विचारल्यावर ते हसले आणि बघूया काय होतं ते असे म्हणाले.  

जर चंपाई सोरेन आमदारांसह भाजपमध्ये दाखल झाले तर हेमंत सोरेन

यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला मोठा धक्का बसेल.

Read also: https://ajinkyabharat.com/assembly-elections-are-being-held-as-a-way-to-empty-the-government-treasury-sanjay-rauta/

Related News