सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळ हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबणीवर -संजय राऊता

महायुतीमध्ये

निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा

निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या दोन राज्यांसोबतच

झारखंड आणि महाराष्ट्रातही निवडणुका होणार असल्याची अटकळ होती.

Related News

मात्र, तसे झाले नाही. यानंतर संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, भाजप नेते एक देश, एक निवडणूक बोलतात, मात्र चार राज्यात

एकाच वेळी निवडणुका घेऊ शकत नाहीत. झारखंडमध्ये भारतीय जनता पक्ष

झारखंड मुक्ती मोर्चा फोडण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्रात अजित पवार

आणि देवेंद्र फडणवीस यांची तिजोरी एकनाथ शिंदे भरत आहेत, असेही ते म्हणाले.

त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत.

त्यांना सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक

लांबवली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

लाडकी बहीण योजनेचे हप्ते महिलांना लाच म्हणू द्यायचा आहे त्यासाठीच

हा खटाटोप आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

Read also: https://ajinkyabharat.com/shiv-sena-party-and-symbol-hearing-again-lambanivar/

Related News