विदर्भातील संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे येथील युवा लेखिका मैथिली लक्ष्मी पुरुषोत्तम गोतमारे हिने अवघ्या १४ व्या वर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपले पहिले कादंबरीरूप पुस्तक “The Boon of Divine Blood” प्रकाशित केले आहे. नववीत शिक्षण घेणाऱ्या या चिमुकल्या लेखिकेच्या यशामुळे संपूर्ण संग्रामपूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मैथिलीचे वडील पुरुषोत्तम गोतमारे हे व्यवसायाने शेतकरी असून, त्यांनी मुलीच्या शिक्षणाबाबत सुरुवातीपासूनच विशेष लक्ष दिले. नर्सरीपासूनच तिला शेगाव येथील माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये दाखल करण्यात आले. सध्या ती तेथेच नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शालेय जीवनातच वाचनाची आवड जोपासत असताना तिने लेखन क्षेत्रात पाऊल टाकले आणि आपल्या कल्पनाशक्तीला आकार देत ही कादंबरी साकारली.
“The Boon of Divine Blood” ही कादंबरी प्रवास आणि रहस्य यांच्या धाग्यांनी विणलेली आहे. कथानक चंद्राच्या कन्येच्या शोधाभोवती फिरते आणि वाचकाला एका कल्पनारम्य, रोमांचक विश्वात घेऊन जाते. विविध अनुभव, संघर्ष आणि अनपेक्षित वळणांनी कथा पुढे सरकते. मानवी जिज्ञासा, ध्येयभावना आणि अंतर्मनाचा शोध या संकल्पना कथेमधून प्रभावीपणे उलगडतात. इतक्या लहान वयात एवढ्या परिपक्व कल्पनाशक्तीने साकारलेले हे लेखन वाचकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
Related News
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
Continue reading
नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोठी फिल्डिंग; रविंद्र चव्हाणांचा 2 दिवसांचा विदर्भ दौरा
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय ...
Continue reading
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
Continue reading
वनप्लसचा स्वातंत्र्य दिन सेल 2026 : 7 ऑगस्टपासून धमाकेदार ऑफर्स, फ्लॅगशिप स्मार्टफोन्ससह टॅब्लेट आणि इअरबड्सवर मोठी सूट
OnePlus चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; स्वातंत...
Continue reading
IMD Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा जोर; 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा, विदर्भात रेड अलर्ट
महाराष्ट्रात पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुस...
Continue reading
'द इंडिया स्टोरी' चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता श्रेयस तळपदे यांनी अन्नपदार्थांमधील भेसळ, वाढते कॅन्सरचे प्रमाण आणि पुढील पिढीच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. शुद्ध अन्न...
Continue reading
भारतात Lava Virat V1 आणि Lava Virat V1 5G स्मार्टफोन 24 जुलै 2026 रोजी लाँच होणार आहेत. 120Hz डिस्प्ले, 6000mAh बॅटरी, IP64 रेटिंग, Unisoc प्रोसेसर आणि बजेट किंमतीतील या फोनचे संपू...
Continue reading
जयंत पाटील काय निर्णय घेतील, लवकरच कळेल; शिंदे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचे सूचक वक्तव्य, राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण
जयंत पाटील काय निर्णय घेणार? : राज्याच्या राजकार...
Continue reading
OPPO Reno 16C Launch : भारतीय स्मार्टफोन बाजारात सातत्याने नवे आणि अत्याधुनिक फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच होत आहेत. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीव...
Continue reading
AI Stock Market Crash 2026: फक्त दोन वैज्ञानिकांनी बदलली नोकरी आणि तब्बल 250 अब्ज डॉलरचा धक्कादायक फटका!
जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्राची क्रांती सुरू असताना एका आठवड्या...
Continue reading
मुंबई : नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतातील प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वर iPhone 15,...
Continue reading
Donald Trump Tariff Threat: इराण संघर्ष संपताच ट्रम्प यांचा नवा इशारा; फ्रान्सच्या वाईन आणि शॅम्पेनवर 100% शुल्काची धमकी
अमेरिका-इराणमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावानंत...
Continue reading
या यशामागे तिचे आई-वडील — पुरुषोत्तम गोतमारे आणि लक्ष्मी गोतमारे — यांचा अखंड विश्वास, सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि भक्कम पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्या साथीतूनच मैथिलीच्या लेखनाला दिशा आणि बळ मिळाले. तसेच या कादंबरीच्या प्रकाशनासाठी के. डी. ढोले सर यांचे मार्गदर्शन लाभले असून, शाळेच्या प्राचार्या मृणाल पाटील मॅडम यांनीही वेळोवेळी प्रोत्साहन देत तिच्या साहित्यप्रवासाला चालना दिली.
ही कादंबरी दिल्लीस्थित Bluerose Publishers Limited या नामांकित प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. पुस्तक Amazon, Flipkart तसेच इतर ऑनलाइन विक्री मंचांवर उपलब्ध आहे.
मैथिलीच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळाली आहे. शिक्षणासोबत छंद जोपासला तर यश निश्चित मिळू शकते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मैथिली गोतमारे होय. तिच्या पुढील साहित्यप्रवासासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/shiv-jayanti-festive-decorations-in-district-school-lohari-khurd/