तीन विद्यापीठांच्या प्रमुखांनी दिले राजीनामे!
बांग्लादेशमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करताच पंतप्रधान शेख हसीना
यांना पद सोडून भारतात दाखल व्हावं लागलं होतं. बांगलादेशनंतर अमेरिकेत देखील
Related News
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
अकोटफैल परिसरात लुटमार करणाऱ्या ‘शेट्टी टोळी’चा पर्दाफाश; चार सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मेळघाटात पर्यटकांसमोर दीड तास ‘लेडी ऑफ लेक’चा रुबाब; निसर्गप्रेमींच्या आनंदाला पारावर नाही
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अमेरिकेतली पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थी संघटना
डेमोक्रेटिक सोशालिस्टस ऑफ अमेरिका यांनी आंदोलन सुरु केलं आहे.
या विद्यार्थ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून या शैक्षणिक वर्षातील
आगामी सत्रात बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थी घरीच अभ्यास करणार असून विद्यापीठ आणि महाविद्यालयांवर
बहिष्कार टाकणार आहेत. गेल्या शैक्षणिक सत्रात देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु ठेवलं होतं.
द फ्री प्रेसच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेतील लोकशाही, समाजवादी तरुणांची
संघटना वायडीएसएनं गेल्या महिन्यात एक योजना बनवली होती.
त्यानुसार देशातील 100 हून अधिक विद्यापीठांमधील सदस्यांना आंदोलनात
भाग घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पॅलेस्टाईनसाठी विद्यार्थी
संपावर अशी त्याची टॅगलाईन होती. वायडीएसएनं 2024-25 पासून
सुरुवातीच्या शैक्षणिक सत्रांमध्ये विद्यापीठांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणसंस्थांच्या परिसरात गाझा पट्टीत शस्त्रसंधी
आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू मांडण्यासाठी संप करण्याचं आवाहन
करण्यात आलं होतं. त्यावेळी विद्यार्थ्यांना हे आंदोलन किती दिवस किंवा
कालावधीपर्यंत सुरु राहणार हे सांगण्यात आलं नव्हतं. अमेरिकेतील डाव्या विचाराच्या
विद्यार्थ्यांच्या संघटनांनी हे नव्या प्रकारचं आंदोलन पुकारलं आहे.
ते विद्यार्थी पॅलेस्टाईनच्या नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उठवत आहेत.
गेल्या शैक्षणिक सत्रात देखील विद्यार्थी कॉलेजच्या परिसरात आक्रमक
भूमिका घेतली होती. काही विद्यापीठांमध्ये हिंसक घटना देखील घडल्या होत्या.
कोलंबिया आणि कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता.
या दरम्यान तीन विद्यापीठांच्या प्रमुखांनी राजीनामे दिले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/jai-pawar-likely-to-contest-assembly-elections-from-baramati/