बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत -संजय राऊत

 संजय राऊतांचा

 संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला

काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर

यांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असं वक्तव्य केलं होतं.

Related News

दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

यांनी प्रकाश आंबेडकरांना खोचक टोला लगावलाय.

“बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत”,

असं म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष केलय.

ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय.

मुख्यमंत्री लोचट मजनू आहे. अतिशय  लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय.

यापूर्वी दिल्लीसमोर झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट

मुख्यमंत्री पाहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला

वेदना होईल असं वर्तन मुख्यमंत्री करतात. हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतात.

ज्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी ठेवणार. महाराष्ट्राला बदल हवाय

त्यासाठी आम्ही कंबर कसतो आहोत, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/thar-rocks-and-ola-electric-bike-to-be-launched-on-august-15/

Related News