कोलकाताच्या घटनेचे पडसाद अकोल्यात.

मेडिकल

मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये

9 ऑगस्टला एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून

Related News

तिचा खून करण्यात आल्याची अतिशय घृणास्पद घटना घडली.

त्याचे पडसाद अकोल्यातील मेडिकल कॉलेजमध्ये उमटले आहेत.

या घटनेचा निषेध करत निवासी डॉक्टर संघटनेने

अत्यावश्यक सेवा वगळता कामबंद आंदोलन पुकारले आहे.

आज या निवासी डॉक्टरांनी घटनेच्या निषेधार्थ मेडिकल कॉलेजच्या परिसरात

निदर्शने करत रैली काढली व न्याय मिळावा यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.

जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवू

असा इशारा डॉक्टरांनी दिलाय. डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे

रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/modi-shahani-maharashtras-losses-are-bananas-sanjay-raut/

Related News