मोदी-शहांनी महाराष्ट्राचे नुकसान केले – संजय राऊत

अकोला

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस

यांनी जेवढं महाराष्ट्राचे नुकसान केले तेवढेच 100 वर्षात कुणी केले नाही,

अशी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

Related News

आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी खासदार संजय राऊत

बुधवारी अकोला जिल्ह्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खासदार राऊत म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव झाला.

महाराष्ट्रातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.

आगामी निवडणुक लक्षात घेता महायुती सरकारने लाडकी बहिन योजना सुरू केली.

लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे, आमचे सरकार आल्यावर या योजनेचे पैसे

आम्ही वाढविणार आहेत. सध्या महायुती सरकारकडून शिवसेना आमदार नितीन देशमुख

यांना नाहक त्रास दिल्या जात आहे. देशमुख हे सुरत येथुन मोदी-शहांच्या

तुरूंगाच्या भिंती फोडून आले. ते 50 खोक्यांना विकल्या गेले नाहीत,

म्हणून त्यांच्या मागे चौकश्या लावून त्यांना त्रास देण्याचे काम सरकार करीत आहे.

महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेनेच्या आमदार,

पदाधिकाऱ्यांना चौकशींचा धाक दाखवून त्रास दिल्या जातोय.

त्यांना काय चौकश्या करायच्या करू द्या, आम्ही त्यांना घाबरत नसल्याचे खासदार राऊत म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/help-farmers-by-declaring-hail-drought/

Related News