ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या!

वंचित

अकोल्यात ओला दुष्काळ जाहीर करा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा,

अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर

Related News

मोर्चा काढला. यावेळी मागण्याचे निवेदन वंचितने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

अकोला जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला.

बार्शीटाकळी, बाळापूर, अकोला तालुक्यात अतिवृष्टी झाली.

पहिल्या वेळी १५ तर नंतर ६ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.

ऑगस्ट महिन्यातही अधून-मधून दमदार पाऊस पडत आहे.

दरम्यान जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी

वंचितने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांना सादर केलेल्या निवेदनात केली.

यावेळी वंचितचे  जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे,

जि.प अध्यक्षा संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, गजानन गवई,

प्रतिभा अवचार, सम्यकचे जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे, किशोर जामणीक,

यांच्यासह पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/pride-of-the-country-on-the-occasion-of-independence-day-ajintha-verulcha-honored-in-the-art-of-the-state/

Related News