धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थ धर्मांतराचा अधिकार नाही -अलाहबाद हायकोर्ट

अलाहबाद हायकोर्ट

अलाहबाद हायकोर्ट ची मोठी टिप्पणी

जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडणे आणि

लैंगिक शोषण करण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन

Related News

अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने सांगितले की,

उत्तर प्रदेश बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर प्रतिबंध कायदा 2021 चा

उद्देश सर्व व्यक्तींना धार्मिक स्वातंत्र्याची हमी देणे आहे.

जो भारतातील सामाजिक समरसतेचे दर्शन घडवतो.

या कायद्याचा उद्देश भारतातील धर्मनिरपेक्षतेची भावना कायम ठेवणे आहे.

संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मावर विश्वास ठेवण्याचा,

आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे,

परंतु या व्यक्तीगत अधिकाराचे रूपांतर धर्मांतर करण्याच्या सामूहिक अधिकारात होत नाही.

ज्या मुलीने ही माहिती दिली ती आपल्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती,

ती मुलगी स्वेच्छेने घर सोडून गेली होती, असा दावा त्याने केला.

मात्र मुलीचे जबरदस्तीने धर्मांत झाल्याचे समोर आल्यानंतर,

आरोपी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला नाही.

त्यानंतर न्यायालयाने आरोपी अझीमचा जामीन अर्ज फेटाळला.

Read also: https://ajinkyabharat.com/schedule-of-10th-and-12th-exams-announced/

Related News