महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दिला जाणारा
‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’यंदा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल
यांना जाहीर झाला आहे. अनुराधा पौडवाल यांना यंदा या मानाच्या पुरस्काराने
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
सन्मानित केले जाणार आहे. यासोबतच अन्य 12 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा
सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी केली आहे. अनुराधा पौडवाल यांच्यासोबतच यंदा
‘भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’
आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे.
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार
मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे.
शुभदा दादरकर यांना यंदाचा ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी
जीवनगौरव २०२४’जाहीर झाला आहे. त्यांना संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या
विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल २०२४चा
‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे.
‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार’
साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ हा 10 लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र दिले जाणार आहे.
अनुराधा पौडवाल यांच्या आवाजाने अनेक हिंदी,मराठी गाणी सदाबहार झाली आहेत.
अनुराधा पौडवाल या दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल यांच्या पत्नी आहेत.
त्यांची संगीत क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख आहे.
यापूर्वी त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarangenchis-big-announcement-from-nashik/