अकोल्यात माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला!

भाजपच्या माजी

भाजपच्या माजी नगरसेविकेसह अनेकांवर गुन्हे दाखल

माजी सैनिक संघटना आक्रमक; तत्काळ कारवाई करण्याची मागणी

अकोल्यात भाजपच्या माजी नगरसेविका आणि नगरसेविकेचा पती

Related News

तसेच इतर सहा जणांनी एका माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात माजी सैनिक हा गंभीर स्वरूपात जखमी झाला असून

त्यांच्यावर अकोल्यातल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

बुद्धपाल सदांशिव अस या जखमी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.

या प्रकरणात अकोला पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेविका ‘मंगला सोनोने’

आणि त्यांचे पती गजानन सोनोने’ यांच्यासह 8 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

जागेच्या वादातून हा संपूर्ण वाद झाल्याचं समजते आहे.

लोखंडी रॉड आणि लाठ्या काट्याने या माजी सैनिकावर हा जीवाघेणा हल्ला केला गेला.

दरम्यान या घटनेनंतर आता अकोल्यात माजी सैनिक संघटना चांगलीच आक्रमक झाली.

माजी सैनिकांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढत

माजी सैनिकावर हल्ला करणाऱ्या भाजपच्या नगरसेविका आणि इतर सर्व

दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

येत्या दोन ते तीन दिवसात सर्व आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा राज्यभरात

माजी सैनिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही यादरम्यान देण्यात आला.

Read also: https://ajinkyabharat.com/big-blow-to-sharad-pawar/

Related News