पुणे क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; 1 कोटीचं ड्रग्ज जप्त, तिघांना अटक

शिक्षणाचं माहेरघर

शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात अडकलं की काय?

असा प्रश्न निर्माण झाला अहे. पुण्यात तब्बल कोटीचं अमली पदार्थ जप्त

करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठी ड्रग्ज रॅकेट्स

Related News

समोर येत आहेत. अशातच पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात

एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

या ड्रग्जचे बाजार मूल्य एक कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.

साधारण अर्धा किलो एमडी डॅक्सचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी 3 तरुणांना अटक केली आहे.

श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अभनावे

अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून या तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

त्यांच्याकडून तब्बल एक कोटींचे 471 ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/sharad-pawar-uddhav-thackeray/

Related News