पत्रकाराच्या प्रश्नावर संतापले प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणुका

विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून

महायुती व महाविकास आघाडीकडून प्रचाराचा नारळही फोडला जात आहे.

विशेष म्हणजे, अनेक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे

Related News

धावाधाव सुरू केली आहे. दुसरीकडे राज्यात विविध राजकीय पक्षातील

नेत्यांचे महाराष्ट्र दौरे सुरू झाले आहेत. तर, सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला असून

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी

शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. आपल्या रॅलीतून ते सत्ताधारी व विरोधक

दोघांनाही लक्ष्य करत आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी

आरक्षण बचाव यात्रा सुरू केली असून त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर

निशाणा साधला आहे. तसेच, मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास

आपला विरोध असल्याचंही त्यांनी म्हटलं. यादरम्यान, आज नांदेडमध्ये एका पत्रकाराच्या प्रश्नावर

प्रकाश आंबडेकर संतापल्याचं पाहायला मिळालं.

तसेच, तुझं जेवढं वय नाही, तेवढी माझी पत्रकारीतेत हयात गेलीय, असेही त्यांनी पत्रकाराला सुनावलं.

कुणबी मराठा डबल भूमिका घेत असेल, तर विधानसभा निवडणुकीत

वंचित आघाडी एकही कुणबी मराठा उमेदवार देणार नाही आहे का? असा प्रश्न पत्रकाराने

प्रकाश आंबेडकर यांना विचारला होता. त्यावरुन, आंबेडकर चिडल्याचे दिसून आले.

तुझं जेवढं वय नाही ना, तेवढी तुझ्या ह्या पत्रकारितेत माझी गेलेली आहे.

हे पेड विचारणारे प्रश्न आहेत, हे मला नका विचारु कारण मी राजकारणातला बाप आहे,

असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर संताप व्यक्त केला.

या घटनेचा व्हिडिओही आता सोशल मीडियातून समोर आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/demand-for-postponement-of-neet-pg-chi-exam-from-supreme-court-is-fatal/

Related News