पश्चिम बंगालमध्ये मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले

रेल्वे वाहतूक

रेल्वे वाहतूक विस्कळीत

पश्चिम बंगाल मधील मालदा जिल्ह्यातील कुमेदपूर येथे मालगाडीचे

पाच डबे रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Related News

रेल्वे प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. बिहार-बंगाल सीमेजवळ झालेल्या अपघातामुळे

रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे मार्ग सुरळीत चालण्यासाठी

मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी

सब्यसाची डे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 10:45 च्या सुमारास हा अपघात झाला.

एकूण पाच वॅगन रुळावरून घसरल्या. परंतु, सुदैवाने, कोणीही जखमी झाले नाही, असं डे यांनी सांगितलं.

कटिहार विभागातील कुमेदपूर स्टेशनवरून ही मालगाडी जात होती.

यावेळी ही मालवाहू ट्रेन रुळावरून घसरली. यामुळे मुख्य मार्ग पूर्णपणे ब्लॉक झाला.

दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अभियांत्रिकी समस्येमुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे.

मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल.

कटिहार विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) सुरेंद्र कुमार यांनी सांगितलं की,

घटनेचे नेमके कारण अद्याप निश्चित झाले नाही.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/100-bjp-mps-met-pm-modi/

Related News