मनसेचा चौथा उमेदवार जाहीर!

भाजप विरोधात

भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून

उमेदवारांची यादीच जाहीर होताना पाहायला मिळत आहे.

Related News

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर, धाराशिव,

लातूर दौरा करुन ते आज हिंगोलीत पोहोचली आहेत.

हिंगोलीत त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं, चक्क जेसीबीने

फुलांची उधळण करत राज ठाकरेंचा हिंगोली मनसैनिकांनी सन्मान केला.

यावेळी, येथील मनसे पदाधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी

हिंगोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली आहे.

हिंगोली विधानसभेतून मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुठे यांची राज ठाकरे यांच्याकडून

उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या आढावा बैठकीनंतर

स्वतः राज ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे.

त्यामुळे, मनसेनं 4 जणांचं तिकीटवाटप केल्याचं पाहायला मिळत आहे.

हिंगोली विधानसभा मतदारसंघात तानाजी सखारामजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत.

आता, या मतदारसंघातून मनसेनं उमेदवारी जाहीर करत हिंगोली मनसेच्या जिल्हाध्यक्षांना

तिकीट दिलं आहे. राज ठाकरेंनी चक्क खांद्यावर हात ठेऊन, आता तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या,

असे आवाहन हिंगोलीकरांना व मनसैनिकांना केलंय.

त्यामुळे, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यात आत्तापर्यंत मनसेचे 4 उमेदवार

जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये, दोन उमेदवार भाजपाविरुद्धच असल्याचं दिसून येतं.

पंढरपूर आणि आता हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत.

त्यामुळे, लोकसभा निवडणुकांवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करणाऱ्या

मनसेनं विधानसभेला महायुतीतून फारकत घेतल्याचं दिसून येत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/there-is-no-money-to-exchange-money-for-girls-sister/

Related News