मुहम्मद यूनुस यांच्याकडे बांगलादेशचे नेतृत्व

 

आज स्थापणार नवीन अंतरिम सरकार

नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये

Related News

आज नवीन अंतरिम सरकार स्थापन होत आहे.

विद्यार्थ्यांनी अनेक आठवडे केलेल्या तीव्र निदर्शन आणि संघर्षानंतर

बांगलादेशमध्ये अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली.

ज्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि

देश सोडला. हसीना यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळले आणि

बांगलादेशमधील स्थिती हाताळण्यासाठी लष्कराशिवाय पर्यायच उरला नाही.

दरम्यान, देशाचे नेतृत्व करावे आणि सरकार स्थापन करावे यासाठी

नोबेल विजेते मुहम्मद युनूस यांना विनंती केली.

जी त्यांनी स्वीकारल्याने बांगलादेश सध्या अंतरीम सरकार

स्थापन करण्याच्या टप्प्यावर आहे.

बांगलादेशची सूत्र हाती घेणारे मुहम्मद युनूस हे त्यांच्या मायक्रोफायनान्स

नवकल्पनांमुळे “गरिबांसाठी बँकर” म्हणून ओळखले जातात.

ते आज आपल्या सल्लागारांच्या टीमसह मुख्य सल्लागार म्हणून

शपथ घेणार आहेत. ते पॅरिसहून ढाका येथे येत आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/former-chief-minister-of-west-bengal-buddhadeb-bhattacharya-passes-away/

Related News