9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे.
Related News
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटात भूकंप: प्रशांत जगताप आणि राहुल कलाटे यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय, शरद Pawar गटावर दाब
शरद Pawar हे महाराष्...
Continue reading
अकोला :महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने आर्थिक वर्ष २०२५–२०२६ ते २०२९–२०३० या कालावधीसाठी महावितरणने सादर केलेल्या सुधार...
Continue reading
Hibiscus: हृदयासाठी औषधी फुलाचे चमत्कारी फायदे
Hibiscus : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदयाचे आरोग्य राखणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. हृदयवि...
Continue reading
loan मधून मुक्त होण्याचे तीन अनमोल ट्रिक्स: कोणीही सांगणार नाहीत, वाचा सविस्तर!
आजच्या आर्थिक युगात, व्यक्ती आणि कुटुंब यांना गरज पडल्यास बँकेचे loan कि...
Continue reading
Year Ender 2025 : ‘या’ 3 राशींचं नशीब फळफळणार! लक्ष्मी नारायण योगाने जीवनात येणार भरभराट
Year 2025 अनेक घटनांनी भरलेले वर्ष ठरले आहे. या वर्षात ...
Continue reading
मोठी बातमी : संतोष देशमुख हत्या प्रकरणात Valmik Karadला मोठा धक्का, हायकोर्टाने जामीन फेटाळला
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य ...
Continue reading
Maharashtra पुन्हा गारठणार; 8 जिल्ह्यांत थंडीची लाट, प्रदूषणाचीही चिंता – हवामान विभागाचा इशारा
Maharashtra हिवाळ्याचा प्रभाव पुन्हा एकदा तीव्र हो...
Continue reading
Mahad नगरपरिषद निवडणूक निकाल – भरत गोगावलेचा मास्टरस्ट्रोक, तटकरेंना मोठा धक्का
Mahad नगरपरिषद निवडणुकीत कोकणच्या राजकारणाचे केंद्र पुन्हा एकदा महाड विध...
Continue reading
Maharashtra नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2025 निकाल : नेत्यांची प्रतिष्ठा, मुलगा-बायको-शिलेदारांची लढत आणि टेन्शन
Maharashtra तील नगर परिषद आण...
Continue reading
China मधील फूड डिलिव्हरी राइडरने ५ वर्षांत वाचवले १.४२ कोटी रुपये; जाणून घ्या त्याचे दररोजचे कठीण शेड्यूल
China मधील एक फूड डिलिव्हरी राइडरने फक्त पाच व...
Continue reading
प्रतिनिधी : देवानंद खिरकर
‘बालविवाह मुक्त भारत संकल्प अभियान – १०० दिवस’ आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या उपक्रमांअंतर्गत अकोट...
Continue reading
9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेची सुरुवात होणार आहे.
महायुती सरकारच्या काळातील घोटाळे आणि खोट्या आश्वासनांचा जनतेपुढे
पर्दाफाश करण्याचा उद्देश या यात्रे मागे आहे, अशी माहिती
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेले आहे.
राज्यातील अनेक उद्योक राज्याबाहेर गेले आहे.
मोजक्या उद्योगपचींची भरभराट झाली आहे.
कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम
हिसकावून घेत आहेत. हे सर्व राज्यकर्ते उघड्या डोळ्यांना पाहत बसले आहेत.
त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे
दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात करणार आहोत. पहिल्या टप्प्यात
दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांतून फिरणार असून
लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार आहे असे त्यांनी म्हटले आहे
9 ऑगस्ट या दिवशी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नारा
क्रांती मैदानातून देण्यात आला होता. त्यासोबत या दिवशी
जागतिक आदिवासी दिवस असल्याने देखील हा निवडल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा
आशीर्वाद घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला नाकारले.
राज्यातील 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला.
त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय आहे.
परिणामी सरकार वाचवण्यासाठी महायुतीकडून वेगवेगळ्या योजनांचा
भडीमार करण्यात आला आहे.
तसेच सरकारी तिजोरी मोकळी करत आहेत.
असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.
Read also: https://ajinkyabharat.com/jan-sanman-yatrala-good-response-from-people-ajit-pawar/