केरळमधील भूस्खलनग्रस्तांसाठी अल्लू अर्जुनचा मदतीचा हात

वायनाड आपत्ती

वायनाड आपत्तीग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांचा निधी

केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

या नैसर्गित आपत्तीमुळे आतापर्यंत 308 जणांना जीव गमवावा लागला असून

Related News

शेकडो जण अजूनही बेपत्ता आहेत. साउथ स्टार्स नयनतारा, तिचा पती विघ्नेश शिवन,

मोहनलाल यांनी आपत्तीग्रस्तांसाठी लाखो रुपयांची देणगी दिली होती.

आता अभिनेता अल्लू अर्जुननेही आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

त्यांनी 25 लाखांची मदत केली आहे. 30 जुलै रोजी चुरलमला आणि मुंडक्काई येथे भूस्खलन झालं.

अभिनेता अल्लू अर्जुनने  पीडितांना मदत करत त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली आहे.

अल्लू अर्जुनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून भूस्खलनाच्या घटनेबद्दल

दु:ख व्यक्त केलं आहे. अल्लू अर्जुनने लिहिलं आहे की, ‘वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे

मला खूप दु:ख झालं आहे. केरळने मला नेहमीच खूप प्रेम दिलं आहे

आणि मला पुन्हा 25 लाख रुपये केरळच्या सीएम रिलीफ फंडात

पुनर्निर्माणासाठी दान करून योगदान द्यायचं आहे.

तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि सामर्थ्यासाठी प्रार्थना.’

Read also: https://ajinkyabharat.com/shravanath-st-sange-pilgrimage-scheme/

Related News