खडकवासला धरण 65 टक्क्यापर्यंत खाली करा,
अजित पवारांच्या सूचना
पुण्यात धरण परिसरात तुफान पाऊस सुरू आहे.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे.
गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर
प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.दरम्यान पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील
एकता नगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झालीय.
सोसायटी मधील नागरिकांना बाहेर काढण्यात येतंय.
दरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला
पाण्याचा विसर्ग वाढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तर धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे तसेच
निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरण भरू लागली आहेत.
धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना
अजित पवारांनी दिल्या आहे. धरणात 65 टक्केपर्यंत पाणी सोडावे
असे अजित पवारांनी सांगितले. तसेच पाणी सोडताना नागरिकांना सूचित करावं
असे देखील अजित पवारांनी सांगितले आहे. खडकवासला धरण हे 65 टक्केपर्यंत
खाली केलं तर रात्री पाऊस पडला तर धरणात पाणी राहील असे अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे आणि जिल्हा परिसरात
आज जोराचा पाऊस होत असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे.
नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना
सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ,
एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी.
लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी,
अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका
आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.