2026 Grammy Awards : केंड्रिक लॅमार आणि बॅड बनी यांना सर्वोच्च सन्मान
दिवसाअखेरीस संगीतविश्वातील सर्वात प्रतिष्ठित आणि मोठ्या प्रमाणावर चर्चिले जाणारे Grammy Awards 2026 मध्ये लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो.कॉम एरिनामध्ये आयोजित करण्यात आले. या 2026 Grammy Awards सोहळ्याचे आयोजन आणि सूत्रसंचालन कॉमिक आणि प्रसिध्द होस्ट ट्रेवर नोआ यांनी केले, तर प्रेझेंटर्समध्ये हॅरी स्टाइल्स, चार्ली एक्ससीएक्स, चॅपेल रोआन, जेफ गोल्डब्लम, तेयाना टेलर, निक्की ग्लेजर आणि मार्सेलो हर्नांडेज यांचा समावेश होता.
या वर्षीच्या Grammy Awardsसोहळ्यात केंड्रिक लॅमार, बॅड बनी आणि लेडी गागा हे कलाकार सर्वात मोठे विजेते ठरले. भारतीय संगीत क्षेत्रालाही जागतिक स्तरावर आपली उपस्थिती दाखवण्याची संधी मिळाली, ज्यात अनुष्का शंकर, सिद्धांत भाटिया, तसेच शाक्ति आणि चारू सूरी यांचा समावेश होता. मात्र, भारतीय कलाकारांनी या वर्षी 2026 Grammy Awards विजेत्यांचा सन्मान मिळवता आला नाही.
Grammy Awards 2026 : सर्वात मोठे पुरस्कार आणि विजेते
अल्बम ऑफ द इयर (Album of the Year)
बॅड बनी यांचे Debi Tirar Mas Fotos हे अल्बम वर्षाचे सर्वोत्तम अल्बम ठरले. हे अल्बम त्यांच्या संगीतातील वैविध्य आणि नवीन प्रयोगांसाठी प्रशंसित झाले.
Related News
रेकॉर्ड ऑफ द इयर (Record of the Year)
केंड्रिक लॅमार आणि SZA यांच्या Luther या गाण्याला रेकॉर्ड ऑफ द इयरचा सन्मान मिळाला. केंड्रिक लॅमारच्या अभूतपूर्व रॅप शैलीने आणि SZA च्या आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध केले.
बेस्ट लॅटिन अर्बन अल्बम (Best Latin Urban Album)
बॅड बनी यांचेच Debi Tirar Mas Fotos या अल्बमला लॅटिन अर्बन अल्बमसाठी सर्वोत्तम मानले गेले, जे त्यांच्या संगीत प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स (Best Pop Solo Performance)
लोला यंगच्या Messy या गाण्याला पॉप सोलो परफॉर्मन्ससाठी सर्वोत्तम मानले गेले.
सॉंग ऑफ द इयर (Song of the Year)
बिल्ली आयलिश यांचे Wildflower हे गाणे वर्षाचे सर्वोत्तम गाणे ठरले. त्यांच्या भावनापूर्ण गायनाने आणि अर्थपूर्ण शब्दांनी प्रेक्षकांना भाववेटले.
बेस्ट न्यू आर्टिस्ट (Best New Artist)
ऑलिव्हिया डीनला नवोदित कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बेस्ट पॉप वोकल अल्बम (Best Pop Vocal Album)
लेडी गागा यांच्या Mayhem या अल्बमला पॉप वोकल अल्बमसाठी सर्वोत्तम मानले गेले.
बेस्ट रॅप अल्बम (Best Rap Album)
केंड्रिक लॅमारच्या GNX अल्बमला रॅप अल्बमसाठी सर्वोत्तम पुरस्कार मिळाला.
बेस्ट रॅप परफॉर्मन्स (Best Rap Performance)
क्लिप्स आणि केंड्रिक लॅमार व फॅरेल विल्यम्स यांच्या Chains & Whips या गाण्याला या श्रेणीत सर्वोत्तम मानले गेले.
बेस्ट सॉंग रिटन फॉर व्हिज्युअल मीडिया (Best Song Written for Visual Media)
KPop Demon Hunters चे Golden हे गाणे विज्युअल मिडियासाठी सर्वोत्तम गीत ठरले.
बेस्ट अल्बम कव्हर (Best Album Cover)
Chromakopia या अल्बमला उत्कृष्ट कव्हरसाठी सन्मानित करण्यात आले.
सॉंगरायटर ऑफ द इयर (Songwriter of the Year)
एमी अॅलेन हिला या पुरस्काराने गौरवण्यात आले.
बेस्ट पॉप डुओ/ग्रुप परफॉर्मन्स (Best Pop Duo/Group Performance)
सिंथिया एरिव्हो आणि अरियाना ग्रँड यांच्या Defying Gravity या गाण्याला हा पुरस्कार मिळाला.
बेस्ट कंपाईलेशन साउंडट्रॅक फॉर व्हिज्युअल मीडिया (Best Compilation Soundtrack for Visual Media)
सिनर्स या विविध कलाकारांच्या साउंडट्रॅकला हा सन्मान मिळाला.
बेस्ट स्कोअर साउंडट्रॅक फॉर व्हिज्युअल मीडिया (Best Score Soundtrack for Visual Media)
ल्युडविग गोरेन्सन यांचे Sinners या साउंडट्रॅकसाठी हा पुरस्कार मिळाला.
2026 Grammy Awards : इतर महत्त्वाचे विजेते
डान्स/इलेक्ट्रॉनिक अल्बम: FKA Twigs – EUSEXUA
R&B अल्बम: लिओन थॉमस – Mutt
रॉक अल्बम: Turnstile – Never Enough
लॅटिन पॉप अल्बम: Natalia Lafourcade – Cancionera
म्युसिका मेक्सिकाना अल्बम: Carin Leon – Palabra De To’s (Seca)
ट्रॅडिशनल पॉप वोकल अल्बम: Laufey – A Matter of Time
गॉस्पेल अल्बम: Darrel Walls, PJ Morton – Heart of Mine
कॉन्टेम्पररी ख्रिश्चन म्युझिक अल्बम: Israel & New Breed – Coritos Vol. 1
जॅझ वोकल अल्बम: Samara Joy – Portrait
जॅझ इंस्ट्रुमेंटल अल्बम: Sullivan Fortner – Southern Nights
वैश्विक आणि विविध संगीत श्रेणीतील विजेते
आफ्रिकन म्युझिक परफॉर्मन्स: Tyla – Push 2 Start
रेग्गे अल्बम: Keznamdi – BLXXD & FYAH
म्युझिक व्हिडिओ: Doechii – Anxiety
म्युझिक फिल्म: John Williams – Music by John Williams
ऑल्टरनेटिव्ह म्युझिक अल्बम: The Cure – Songs of a Lost World
कॉमेडी अल्बम: Nate Bargatze – Your Friend, Nate Bargatze
ऑडिओबुक, नैरेशन आणि स्टोरीटेलिंग: Dalai Lama – Meditations: The Reflections of his Holiness The Dalai Lama
स्पोकन वर्ड पोएट्री: Mad Skillz – Words for Days Vol. 1
Grammy Awards 2026 : विशेष परफॉर्मन्स आणि सहयोग पुरस्कार
प्रोड्यूसर ऑफ द इयर, नॉन-क्लासिकल: Cirkut
डान्स-पॉप रेकॉर्डिंग: लेडी गागा – Abracadabra
कंट्री सोलो परफॉर्मन्स: Chris Stapleton – Bad As I Used to Be
रॅप सॉंग: Kendrick Lamar ft Lefty Gunplay – TV Of
पॉप डुओ/ग्रुप परफॉर्मन्स: SZA ft Kendrick Lamar – 30 for 30
रॉक परफॉर्मन्स: Yungblud – Changes (Live from Villa Park, Back to the Beginning)
मेटल परफॉर्मन्स: Turnstile – Birds
R&B परफॉर्मन्स: Kehlani – Folded
ट्रॅडिशनल R&B परफॉर्मन्स: लिओन थॉमस – Vibes Don’t Lie
R&B सॉंग: Kehlani – Folded
ट्रॅडिशनल कंट्री अल्बम: Zach Top – Ain’t In It for My Health
ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स: बॅड बनी – EoO
रॉक सॉंग: Nine Inch Nails – As Alive as You Need Me to Be
कंट्री सॉंग: Tyler Childers – Bitin’ List
ऑल्टरनेटिव्ह म्युझिक परफॉर्मन्स: The Cure – Alone
फolk अल्बम: I’m With Her – Wild and Clear and Blue
डान्स/इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग: Tame Impala – End of Summer
जॅझ परफॉर्मन्स: Chick Corea, Christian McBride & Brian Blade – Windows (live)
ऑर्केस्ट्रल परफॉर्मन्स: Andris Nelsons, Boston Symphony Orchestra – Messiaen: Turangalila-Symphonie
Grammy Awards 2026 ने पुन्हा एकदा जगभरातील संगीताचे वैविध्य अधोरेखित केले. केंड्रिक लॅमार, बॅड बनी आणि लेडी गागा यांच्या कामगिरीने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही प्रभावित केले, तर भारतीय कलाकारांनी जागतिक मंचावर आपली उपस्थिती दाखवून दिली. या सोहळ्याने संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना आणि संगीताच्या प्रत्येक शैलीतील प्रतिभांना गौरवले, आणि संगीतप्रेमींना अविस्मरणीय अनुभव दिला.
