मिटकरी-मनसेतील वाद थांबता थांबेना
अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेतला वाद
थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. कारण या प्रकरणात
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
आता दोन्ही पक्षाकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप करत टीकेची झोड सध्या होत आहे.
अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेला
उत्तर देत मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी अमोल मिटकरींवर जोरदार पलटवार केला.
आमदार मिटकरींची तुलना त्यांनी राखी सावंत हिच्याशी केली.
मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत असल्याचे साबळे यांनी म्हटले आहे.
आमच्या नेत्याला पळकुटा म्हणणारे मिटकरीच राडयाच्या दिवशी
अकोला विश्रागृहाच्या बाथरूममध्ये लपले असल्याचं साबळे म्हणाले.
ते अकोला इथे बोलत होते. जय मालोकार यांच्या मृत्यूचा आज
दहावा दिवसही झाला नसताना मिटकरी त्याच्या मृत्युचं राजकारण करत आहेत
असंही मनसे जिल्हाध्यक्ष साबळे म्हणालेय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद संपता संपत नाही आहे.
अशातच आता मनसे नेते अमोल मिटकरींवर आणखी आक्रमक झाले आहेत.
“अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील
नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल.
अमोल मिटकरींनी पुन्हा थोबाड चालवलं तर कपडे काढून मारणार,
असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे.
तर दुसरीकडे अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी
अमोल मिटकरींची तुलना राखी सावंत यांच्याशी करत मिटकरी हे
राजकारणातील राखी सावंत असल्याचे साबळे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे हा वाद आणखी वाढत असल्याचे एकणात चित्र बघायला मिळत आहे.