नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळली
औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात
सुनावणी पार पडली. महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नामांतराला
Related News
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास
सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. नाव देण्याचा आणि
बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे,
असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.
नाव बदललं की, काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच आहेत,
असंही सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे सर्वोत महत्त्वाचा मुद्दा देखील सर्वोच्च न्यायालयानं
सुनावणी दरम्यान अधोरेखीत केला आहे.
अलहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण एकसारखं नाही,
असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील दोन शहरांची नावं बदलल्याच्या विरोधातील
याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
नाव बदलणं हा राज्य सरकारचा अधिकार आहे.
त्यासाठी, न्यायालयीन पुनरावलोकनाची गरज नाही.
हायकोर्टानं तुमचं म्हणणे ऐकून घेऊन सविस्तर आदेश दिले आहेत.
त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
यापूर्वी 8 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयानं औरंगाबादचं नाव बदलून
छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्याचा
राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला होता.
हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं होतं.
आता सर्वोच्च न्यायालयानंही त्यास मान्यता दिली आहे.
त्यामुळे आता औरंगाबादचं ना छत्रपती संभाजीनगर
आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव कायम राहणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/majha-jeev-gelawar-chief-minister-will-take-action-amol-mitkari/