माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत का? -अमोल मिटकरी

पोलिसांनी

पोलिसांनी रिव्हॉल्व्हरने माझ्या डोक्यात गोळ्या झाडाव्यात

माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शिंदे कारवाई करणार आहेत का?

अमोल मिटकरींचा संतप्त सवाल

Related News

राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुनशी लोकांना अकोला पोलीस

पाठीशी घालत आहेत. अकोला पोलीस दलातील अधिकारी मनसेच्या

कर्णबाळा दुनबाळे यांची हॉटेलमध्ये गळाभेट घेतात.

त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.

यावरुन मनसेचे गुंड कोणाच्या जीवावर उडत आहेत, हे दिसून येते.

माझ्यावर मनसेच्या गुंडांनी हल्ला केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार

आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझी फोनवरुन विचारपूस केली.

एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मला फोन केला होता.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मला फोन करावासा वाटला नाही.

माझा जीव गेल्यावर ते शांत होणार आहेत का,

असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.

ते गुरुवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी मनसेचे स्थानिक पदाधिकारी कर्णबाळा दुनबाळे आणि

अकोला पोलिसांवर टीकेची तोफ डागली. राज ठाकरेंच्या पक्षासारखे खुनशी लोक

महाराष्ट्रात सत्तेवर बसवले तर काही खरं नाही.

कर्णबाळा दुनबाळे हा पोलिसांचा लाडका भाऊ आहे का?

त्याच्याविरोधात ठोस कारवाई होत नाही.

कारवाई होत नाही तोपर्यंत मी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरून उठणार नाही.

पोलिसांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून माझ्या डोक्यात सहाच्या सहा गोळ्या घालाव्यात.

गुंडांकडून मरण्यापेक्षा पोलिसांच्या हातून मेलेलं केव्हाही चांगलं आहे,

असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

Read also: https://ajinkyabharat.com/attack-of-jitendra-awhads-gadivar-sambhajirajs-swarajya-sangathan/

Related News