तुमचा पक्षच गुंडाळून टाका !

अॅड. आंबेडकर

अॅड. आंबेडकर यांचा शरद पवारांना खोचक सल्ला

ओबीसीमधून मराठा आरक्षण यावर शरद पवारांनी अगोदर

आपल्या पक्षाची काय भूमिका आहे ते सांगावं ?

Related News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका घ्यावी असे पवार म्हणत असेल

तर पवारांच्या पक्षाची गरज काय? तुमचा पक्षच गुंडाळून टाका,

असा खोचक सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना दिला आहे.

राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची ओबीसीमधून मराठा आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी आहे.

मात्र याला ओबीसी नेत्यांचा तीव्र विरोध होत आहे.

यामुळे राज्य सरकारसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सध्या

ओबीसी बचाव यात्रा सुरु आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडत नसल्यामुळे

प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका असेल त्या भूमिकेसोबत

आम्ही राहू त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण आणणार नाही.

आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, असे मत जेष्ठ नेते शरद पवार यांनी मांडले.

यावरुन सत्ताधारी पक्षांनी देखील शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देखील

आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवारांनी

अगोदर आपल्या पक्षाची काय भूमिका आहे ते सांगावं ? मुख्यमंत्री एकनाथ

शिंदे यांनी भूमिका घ्यावी असे पवार म्हणत असेल तर पवारांच्या पक्षाची गरज

काय ? तुमचा पक्षच गुंडाळून टाका, असा खोचक सल्ला प्रकाश आंबेडकर

यांनी शरद पवार यांना दिला आहे. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना त्यांच्या पक्षामध्ये सामील

होण्याची थेट खुली ऑफर दिली होती. यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी आमदार

रोहित पवार यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, रोहित पवारांना त्यांच्या

आजोबांचा इतिहास माहिती नाही. पहिले त्यांनी त्यांच्या आजोबाचा इतिहास

बघावा असा टोला आंबेडकर यांनी लगावला. तसेच खासदार सुप्रिया सुळे

यांचे वक्तव्य बघावे मग त्यांनी अध्ययन करावे असे देखील वंचितचे नेते प्रकाश

आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/another-landslide-in-the-state-in-the-next-5-days/

Related News