येत्या ५ दिवसांत राज्यात पुन्हा मुसळधार

१ ऑगस्टपासून

१ ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार

मागील काही दिवसांपासून राज्यातील पश्चिम घाट आणि घाट माथ्यावर

सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाने उसंती घेतली आहे.

Related News

मात्र पुन्हा एकदा येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रासाठी

मुसळधार पावसाचा इशारा असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाच्या विभागप्रमुखांनी दिली आहे.

हवामान खात्याने म्हटले आहे की, गुरुवार १ ऑगस्टपासून राज्यातील कोकण,

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मागील आठवडाभर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात भागात मान्सून सक्रिय होता.

गुजरात प्रदेशात काही ठिकाणी गडगडाटी वादळाची नोंद झाली.

तर उत्तर कोकण आणि गुजरात भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

या राज्यात अतिमुसळधार दरम्यान काही राज्यांना ऑरेंज अलर्ट

जारी करण्यात आला असून या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता

असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

यामध्ये पुढीलप्रमाणे अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

१ ऑगस्ट यलो अलर्ट : ठाणे, मुंबई, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर,

गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा

२ ऑगस्ट यलो अलर्टः पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, जालना, परभणी, बीड, हिंगोली,

नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली,

गोंदिया

३ ऑगस्ट यलो अलर्ट: मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, परभणी, बीड,

हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती.

ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा,

औरंगाबाद, जालना, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

Read also: https://ajinkyabharat.com/all-seven-doors-of-radhanagari-strike-opened/

Related News