लोकअदालतीत ६ हजार ९७७ प्रकरणे निकाली

अकोला : राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने जिल्ह्यातील

सर्व न्यायालयांत आयोजित लोकअदालतीत ६ हजार ९७७ प्रकरणे

निकाली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व दिवाणी, फौजदारी, कामगार,

Related News

सहकार, कौटुंबिक व औद्योगिक न्यायालयात, तसेच जिल्हा ग्राहक तक्रार आयोग

येथे शनिवारी (२७ जुलै) लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.

सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी १८ हजार ८२२ प्रकरणे

तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात प्रलंबित १ हजार ७६१ व दाखलपूर्व

५ हजार २१६ प्रकरणांत समेट घडून आला. दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद,

मोटार वाहन अपघात प्रकरण, कलम १३८ एनआयॲक्ट आणि ग्रा. पं. घरपट्टी,

पाणीपट्टी, महावितरण व बँकांची खटलापूर्व प्रकरणात २३ कोटी ७९ लक्ष ३२ हजार ५६० रु. ची

तडजोड झाली, अशी माहिती जिल्हा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी

यांच्या मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, अधिवक्ता यांचे योगदान लाभले.

अधीक्षक व्ही. डी. उबाळे, संजय रामटेके, प्रसन्न गादिया, हरिश इंगळे यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, अकोला बार असोसिएशन,

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांचे सहकार्य लाभले.

Read also: https://ajinkyabharat.com/sanjay-dutt-announces-new-film-on-his-birthday/

Related News