११ मतदान केंद्राच्या इमारती जीर्ण; मतदान केंद्रे इतर ठिकाणी स्थलांतरित

अकोला पूर्व

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ६ मतदान केंद्रातील

मतदारांची संख्या वाढल्याने त्यांना लगतच्या मतदान केंद्रावर

स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, ११ मतदान केंद्राच्या इमारती

Related News

जीर्ण झाल्याने ही मतदान केंद्रे सुस्थितीतील इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहे,

अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली.

उमरी, विठ्ठलनगर येथील जि. प. प्राथमिक मराठी शाळा क्र. २ येथील मतदान क्र. १३९ मधील १२५ मतदार

तिथल्याच मतदान केंद्र १४० मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

रणपिसेनगर येथील जागृती विद्यालयातील मतदान केंद्र १९१ वरील ३०९ मतदार

त्याचठिकाणी असलेल्या केंद्र २०३ मध्ये समाविष्ट केले आहेत.

त्याचप्रमाणे, सीताबाई कला महाविद्यालय येथील म. कें. २१५ मधील १९० मतदार क्र. २१३ मध्ये,

समता विद्यालय, भौरद येथील क्र. २४२ मधील २५६ मतदार क्र. २३९ मध्ये,

खडकी जि. प. मराठी शाळेतील क्र. २८५ मधील ९१ मतदार क्र. २८६ मध्ये

आणि शिवणी येथील हनुमंत मराठी प्रा. शाळेतील क्र. २९६ मधील १९० मतदार क्र. २९७ मध्ये

समाविष्ट करण्यात आले आहेत. टाकळी खु. येथील ग्रामपंचायत कार्यालयातील

३५ व ३६ ही मतदान केंद्रे तेथील जि. प. मराठी शाळेत, रोहणा येथील जि. प. प्राथ. मराठी शाळेतील

केंद्र क्र. ६६ शाळेच्या पश्चिमेकडील नवीन इमारतीत,

आपातापा येथील जि. प. मराठी शाळेतील केंद्र क्र. ८४ हे तेथील

अंगणवाडी इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे.

खडकी येथील पंजाबराव पाटील काळे विद्यालयातील २८०, २८१. २८९ व २९० ही मतदान केंद्रे

विद्यालयाच्या परिसरातील नवीन इमारतीत हलविण्यात आली आहेत.

चांदूरमधील जि. प. प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्र. ३२६, ३२७ व ३२८ ही केंद्रे

जि. प. वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेत स्थलांतरित करण्यात आली आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/ashwini-vaishnav-to-shut-down-whatsapp-in-india/

Related News